नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या रंग बनविण्याच्या तिरुपती नावाच्या कंपनीला भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहे दरम्यान आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे तब्बल सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान सदरची आग कशामुळे लागली याबाबत तर्क वितर्क सुरू असले तरी सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान या आगीमुळे आजूबाजूच्या कंपन्यांना धोका होण्याची शक्यता असल्याने अग्निशामक दलाने याबाबत खबरदारी घेतली. सदरच्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून इतर कंपन्या तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. ऑइल रंग पेंट व केमिकल मुळे सदरची आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी अडचण निर्माण झाली.
या कारखान्याला आग लागल्यानंतर जवळ असलेल्या बारदान काऱखान्यालाही आगीने घेरले. त्यामुळे दोन कारखान्याची आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले आहे. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान नाशिक रोड येथील अग्निशामक दलाचे कर्मचारी श्रीरंग आडके राजू आहेर मनोज साळवे राजेंद्र काळे राजेंद्र कर्जुले लक्ष्मीकांत बेंद्रे आधी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या आगीमध्ये निश्चित किती लाख रुपयाचे नुकसान झाले याबाबतचा आकडा समजू शकला नाही.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790