नाशिक (प्रतिनिधी): मालेगाव स्टँडवरील लघु व गृह उद्योगासाठी लागणारे मशिनरी विक्री करणाऱ्या दुकानास गुरुवार (ता.२७) रोजी रात्री सुमारे ८.३० ते ८.४५ दरम्यान आग लागली.
यात दुकानातील सर्व मशिनरी जळून खाक झाल्या असून जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव स्टँड येथे साईकृपा योगेश केशव तादरे यांचे मशिन हाऊस नावाचे दुकान आहे. या दुकानात गृह व लघु उद्योगांस लागणाऱ्या मशिनरी विक्रीसह दुरूस्ती कामकाज चालते.
यात घरगुती पीठाच्या गिरणीसह त्यांच्या पार्टची देखील विकी केली जाते. हे दुकान बंद असताना गुरुवार (ता.२७) रोजी रात्री साडे ८.३० ते ८.४५ च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळी एका सुजाण नागरिकांने अग्निशामक दलास दूरध्वनीहून कळविले.
हाकेच्या अंतरावर असलेले अग्निशामक दल काही मिनिटात घटनास्थळी हजर झाले. यावेळी आग विझविण्यासठी पंचवटी विभाग मालेगाव स्टँड येथील दोन बंब, अमृतधाम येथील एक बंब असे एकूण तीन आले.
या आगीत सर्व मशिनरी जळून खाक झाल्या असून जवळपास साडे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन एम के सोनवणे, शिवाजी मतवाड, आय ए पानसरे, ट्रेनी फायरमन संकेत वैष्णव, संतोष मेंद्रे, दिनेश लासुरे, संदीप जाधव, श्रीकांत नागपुरे एम एन शेख तसेच वाहनचालक आर आर काठे, व्हि एम शिंदे, यांनी आग आटोक्यात आणली.
![]()


