नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): महायुतीकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये घोळ सुरु होता. अखेर आज हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.

नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबतही विविध तर्क लावले जात होते. काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. पण, त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले होते.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला होता. पण, नाशिकमधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र, स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारुन गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. नाशिकच्या जागेबाबत तिढा सुटला असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर आता गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्नॅचिंगचे एकूण २० गुन्हे उघड, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक लोकसभेसाठी भाजप देखील प्रयत्नशील होता. पण, शिंदे यांनी नाशिक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. शिवाय भाजपचा उमेदवार बदलाचा दबाव झुगारुन मर्जीतला उमेदवार दिला आहे. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून याचे स्वागत केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790