नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ठार; विद्यार्थ्यांचा रास्ता रोको…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याचा एका वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील संदीप फाउंडेशनसमोर हा अपघात झाला. वेलपुला पुरनावमशी वेलपुला आनंद (वय २२, रा. चिंतल, आंध्र पदेश) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपुला हा संदीप फाउंडेशन संकुलाच्या गेट नं. २ ने बाहेर पडून रस्त्याच्या पलीकडे काही वस्तू घेण्यासाठी गेला होता. परत येत असताना त्याला नाशिककडून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या वाहनाची (क्र. एमएच १५ जीवाय ५३६२) जोरात धडक बसली.

संदीप फाउंडेशन शिक्षण संकुलाच्या गेट नं. २ समोरच हा प्रकार घडला. अपघातानंतर संदीप फाउंडेशनची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनऐवजी तांदुळ भरलेले आढळून आले, जखमी विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790