नाशिक: डोळे आल्यास विद्यार्थ्यांना सुटी देण्याच्या सूचना

नाशिक (प्रतिनिधी): शहरात डोळ्यांचे आजाराचे प्रमाण वाढू लागले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासोबतच शाळांमध्ये इतर मुलांना डोळ्यांचा विकार जाणवत असेल त्या विद्यार्थ्यांना 4 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी सांगितले.

शहरात मागील दोन दिवसांत डोळे येण्याच्या त्रासाचे रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी 140 नेत्ररुग्ण दाखल झाले होते. या रुग्णाची संख्या वाढून शुक्रवारी 156 रुग्ण दाखल झाले. शुक्रवारच्या आकडेवारीत बिटको आणि जाकीर हुसेन या रुग्णालयांतील रुग्णसंख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले होते.याबाबत नागरिकांनी जागरूकता पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ.रावते यांनी केले.

हे ही वाचा:  नाशिक: चेकपोस्टवर कर्तव्यात कसूर, २ पोलिस अमलदारांचे निलंबन

डोळे येणे हा आजार संसर्गजन्य असून सातत्याने हात धुवून डोळ्यानां लावणे, डोळे सातत्याने पाण्याने धूवत राहणे, डोळ्यातून सारखे पाणी येत असल्यास, डोेळ्यात लालसरपणा असल्याची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकार्‍यांकडून इलाज करुन घेणे. डोळ्यांचा आजार बरा होईपर्यंत इतरांच्या संपर्कात येऊ नये, असेही रावते त्यांनी सांगितले.

याबाबत शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांना लेखी स्वरूपात सूचनापत्र देऊन सर्व शाळांतून आवाहन करण्याच्या सूचना मनपा शिक्षणाधिकार्‍यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक लोकसभा मतदार संघात "इतके" टक्के मतदान

डोळे आलेल्या रुग्णास क्वारंटाईन करा- जिल्हा आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्रांना सूचना:
नाशिक जिल्ह्यात डोळे येण्याची साथ सुरु झाली असून संसर्ग वाढू नये, यासाठी डोळे आलेल्या रुग्णांस क्वारंटाईन करा, रुग्णाची योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांना दिल्या आहेत.डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी याबाबत जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो वायरसमुळे होतो.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group