मालेगाव आर्थिक उलाढाल प्रकरणी ईडीचे सात ठिकाणी छापे; १३.५० कोटी जप्त

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मर्चेंट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या मालेगाव शाखेत झालेल्या १९६ कोटी रुपयांच्या संशयित आर्थिक उलाढाल प्रकरणी ईडीने शुक्रवारी (दि. ६) मुंबई व अहमदाबादमध्ये छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणात वसीम वलीमोहंमद भेसानिया उर्फ संजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

गेल्या चार महिन्यात बँकेतून १९६ कोटी रुपयांच्या ठेवी रोखीने काढण्यात आल्या. चहा विक्रेते आणि छोट्या १० ते १२ व्यावसायिकांच्या नावावर उघडण्यात आलेल्या बँक खात्यातून या ठेवी काढण्यात आल्यानंतर ज्यांच्या नावावर खाती होती ते खातेदार सतर्क झाले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

मात्र, यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला. त्या दरम्यान बनावट खात्यांची पोलखोल झाली. या घोटाळ्यामध्ये बँकेतील एक कर्मचारी सहभागी असून त्याने एमडी नावाने बनावट खाते बँकेत काढल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790