विभागीय आयुक्त कार्यालयातील उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुकांनी  20 फेब्रवारीपर्यंत दरपत्रक सादर करावे

नाशिक (प्रतिनिधी): विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक कार्यालयात कामकाजासाठी येणारे अभ्यागत व पक्षकार यांना रास्त भावात चांगल्या प्रतीचा चहा, अल्पोहार व जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कार्यालयाच्या आवारातील उपहारगृह चालविण्यासाठी इच्छुक व्यक्ती / संस्था यांनी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत विहित नमुन्यातील दरपत्रके (अर्ज व प्रपत्र अ) कार्यालीयीन वेळेत कार्यालयातील अभिलेख कक्ष, सामान्य प्रशासन विभाग येथे समक्ष सादर करावीत, असे आवाहन अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) सुभाष बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

विहित नमुन्यातील दरपत्रके (अर्ज व प्रपत्र अ) व याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे संपर्क साधावा.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790