नाशिक: अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४२ जणांवर हद्दपारीची कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४२ जणांवर पोलिसांनी केली हद्दपारीची कारवाई केली आहे. येत्या १५ जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारीक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधीत मांजाची विक्री काही इसमांकडून केली जात असल्याचे यापुर्वी आढळून आले आहे. पतंग उडवितेवेळी सदर मांजाचे घर्षण होऊन तो तुटतो व तो उंच इमारती, झाडे अन्यथा इतरत्र ठिकाणी अडकतो.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

अशा तुटलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होऊन पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, महिला वाहनचालक यांचे जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याचे घटना घडल्या आहेत. तसेच, अशा प्रकारच्या मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वार हे देखील अपघात होऊन जखमी अथवा गतप्राण झालेले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्यानंतर किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, नाशिक शहर व मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांचे सुचनेप्रमाणे परिमंडळ १ व २ मधील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण ४२ आरोपीतांवर हद्दपरीची कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

त्यापैकी नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी ०७ इसमांवर, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांनी २३ इसमांवर, शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांनी ०६ इसमांवर व आनंदा वाघ, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर यांनी ०६ इसमांवर सदरची कारवाई केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

तरी, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधीत नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण तसेच परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त, मोनिका राऊत यांनी केले असून प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790