नाशिक। दि. ८ ऑगस्ट २०२५: आरटीओ ट्राफिक चालानची बनावट लिंक पाठवून तब्बल ६ लाख ९० हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी कार घेतलेल्या इसमाला आरटीओचे ऑनलाइन दंडाचे चलन भरायचा एसएमएस आला. त्यावर ऑनलाइन पेमेंटची लिंक होती. मोबाइलवर आरटीओ ट्राफिक चलनाबाबत मेसेज आला. ऑनलाइन दंड झाला म्हणून अधिकाऱ्याने मेसेज ओपन केला. काही वेळात लिंक ओपन केल्यानंतर कारला ५०० रुपये दंड झाल्याचा मेसेज आला. गाडी नवीन असल्याने बँकेची माहिती भरली. ते बोगस लक्षात आल्यानंतर लिंक आणि अॅप बंद करत ते मोबाइलमधून डिलीट केले.
मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाच्या बँक खात्यातून ५ लाख ९० हजारांची रक्कम यूपीआय व बँकेच्या खात्यातून ऑनलाइन काढून घेण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत. (सायबर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६५/२०२५)