Crime News: नाशिकला कौटुंबिक वादातून टरबूज विक्रेत्याचा कान कापला

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील दिंडोरी नाक्यावरील परशुराम पुरिया उद्यानाजवळ कौटुंबिक वादातून सख्ख्या नातेवाईकांनी दोघं पिता-पुत्रांवर जीवघेणा हल्ला करत धारदार शास्त्राने कानावर वार करत एकाच कान कापल्याचे धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १३) घडली आहे.

या घटनेत विडी कामगार नगर अमृतधाम येथे राहणाऱ्या सोमनाथ आसाराम भोसले याचा उजवा कान कापला असून, नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ भोसले आणि त्याचे वडील आसाराम भोसले असे दोघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करणार- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विडी कामगार नगर येथे राहणार सोमनाथ भोसले दिंडोरी नका परिसरात टरबूज विक्रीचा हातगाड्या लावतो.

डोळ्यांदेखत चोरी; ट्रायल घेण्यासाठी दुचाकी घेऊन गेला, तो परत आलाच नाही, नाशिकमधील घटना!

गेल्या काही दिवसांपासून भोसले व त्याच्या भावात कौटुंबिक वाद होत असे. असे असतांना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दिंडोरी नाका येथे चार ते पाच संशयित नातेवाईक वाद मिटविण्यासाठी आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात वराहांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिवरची लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

त्यावेळी त्यांनी पुन्हा वाद घालत सोमनाथ भोसले याला शिवीगाळ सुरु केली. तर वडील आसाराम भोसले यांच्या डोक्यावर हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने वार केला. सोमनाथ मध्यस्थी करत असतांना त्याच्या पाठीमागून आलेल्या एका हल्लेखोराने त्याच्या उजव्या कानावर वार करत सोमनाथचा कान कापला.

घटनेतील जखमी व संशयित आरोपी हे नात्याने एकमेकांचे भाऊबंद आहेत. दोघाही पिता-पुत्रांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here