क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम: नाशिक -प्रॉपर्टीचा महाकुंभ प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद

नाशिक। दि. १६ ऑगस्ट २०२५: नाशिकमधील ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम: नाशिक -प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृह् प्रदर्शनास पहिल्या तीन दिवसामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास 40 हून अधिक सदनिकांचे आणि 25 हून अधिक प्लॉट चे स्पॉट बुकिंग झाले आहे.तसेच लॉन्ग वीकेंडचा लाभ घेत अनेक साईट व्हिजीटसचे देखील नियोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.

नाशिक जिल्हा तसेच धुळे,जळगाव ,अहमदनगर यासोबतच मुंबई,ठाणे व पुणे येथून देखील नागरिक प्रदर्शनास भेट द्यायला येत असून 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यासाठी नाशिकमध्ये आपले घर असावे अशी भावना प्रकर्षाने दिसून येत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, नाशिकची वाटचाल ग्लोबल सिटी कडे होत असून अशा एक्स्पो मध्ये भविष्यातील नाशिकची झलक बघायला मिळते. उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि संस्कृती या चतु:सूत्री वर शासन ,प्रशासन आणि नागरिक यांच्या सहभागाने भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू

प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले, “औद्योगिक ,शैक्षणिक ,धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये आहेत.त्यामुळे आगामी कालावधीत घरांच्या किमती वाढू शकतात .त्यामुळे रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अत्यंत योग्य व पोषक वातावरण आहे. प्रदर्शन हे आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे असून येथील डोम पूर्ण वातानुकूलित असून प्रशस्त पार्किंग तसेच विविध ऑफर्स ची रेलचेल येथे दिसून येत आहे.”

प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले, “शहराची प्रगती व अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा असून एका गृह प्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात.प्रदर्शनात आकर्षक स्टॉल मध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स, प्लाॅट्स,दुकाने,ऑफिसेस यांचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध असून आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थादेखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत.प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 असून प्रदर्शनास भेट देण्याचे त्यांनी आवाहन केले.”

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

चर्चासत्र:
प्रदर्शनादरम्यान जनजागृतीसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत असून 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ‘ स्मार्ट सिटी-स्मार्ट कुंभ’ या विषयावरील चर्चासत्रात इंडीयन प्लंबिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमीत सिंग अरोरा व इको सोल्युशन्सच्या संचालिका डॉ. अंशुल गुजराती यांनी भाग घेतला .तसेच 16 ऑगस्ट- रोजी झालेल्या ‘शाश्वत शहर, शाश्वत कुंभ’या विषयावरील चर्चासत्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग व इकोफर्स्टचे राकेश भाटिया यांनी सहभाग घेतला .

👉 हे ही वाचा:  नाशिक: जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी आदि कर्मयोगी अभियान यशस्वीपणे राबवावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

चर्चासत्र: दि-18 ऑगस्ट –विषय – पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन.
पहिले सत्र: स्वच्छ हवा, पाणी व जमिनीच्या संवर्धनासाठी कमी खर्चातील सुयोग्य पर्याय , वक्ता- अजित गोखले-संस्थापक -नॅचरल सोल्युशन्स, दुसरे सत्र -बांधकाम आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून नेट झिरो इमारतींची संकल्पना,वक्ता- ममता रावत-संस्थापक आणि सीईओ क्लायमेटनामा प्रा. लि.

प्रदर्शनास दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष अनिल आहेर, उदय घुगे , अंजन भालोदिया,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे हे प्रयत्नशील आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790