Amazon

नाशिक: वादग्रस्त रिल्स करणाऱ्या युवकाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): सोशल मीडियावर धमकावणारे रिल्स व्हायरल करणाऱ्या युवकास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. ओंकार खंडू बोडके (१९, रा. वाघाडी, पंचवटी) असे या संशयिताचे नाव आहे.

संशयित ओंकार बोडके विरोधात ही तक्रार आल्यानंतर पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुन्हे शाखा युनिट एकला कारवाईचे आदेश दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एससी, एसटी प्रवगातील युवक- युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या सूचनेनुसार सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाजीम पठाण, नाईक महेश साळुंके, राजेश राठोड यांच्या पथकाने ओंकार यास ताब्यात घेतले.

त्यास पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ८२६३९९८०६२ या व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी अवैध धंदे, गुन्हेगारांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यानुसार नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पोलिस त्यावर कारवाई करीत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड, मनमाडसह मुंबई-पुण्याहून दिवाळीनिमित्त ४१८ विशेष रेल्वेगाड्या

रिल्स करणाऱ्यांना इशारा:
सोशल मीडियावर वादग्रस्त, धमकाविणारे व्हिडीओ बनवून ते व्हायरल करू नये. शहराची प्रतिमा खराब होईल असे कोणतेही व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790