नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दंडाच्या रक्कमेचे समायोजन होत नसल्याने आता वाहकांचा पुरवठा करणारे पुरवठादारच संपावर जाणार असून, ऐन सणासुदीत नाशिककरांना संपाचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून ‘ग्रॉस टू कॉस्ट’ तत्त्वावर बससेवा चालविली जाते. चालकांना किलोमीटरप्रमाणे पैसे अदा केला जातात. त्याचबरोबर चालक, वाहक तसेच तिकीट संकलनासाठीदेखील पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु बससेवा सुरू झाल्यापासून पाचवेळा विविध कारणांमुळे संपाला सामोरे जावे लागला आहे.
नियमबाह्य आकारण्यात आलेला दंड कमी करावा, या मागणीसाठी मागील संप झाला. समायोजनाच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. समायोजन अद्यापही न झाले नाही.
दरम्यान, आता वाहकांकडून दिवाळी सानुग्रह अनुदानाची मागणी होत असल्याने दंडाची रक्कम समायोजित करावी अन्यथा सेवा बंद केली जाईल, असे सिटीलिंक कंपनीला कळविण्यात आले आहे.
त्यामुळे सोमवार (ता. १६) होणाऱ्या बैठकीत निर्णय न झाल्यास चालक, वाहक कुठल्याही क्षणी संपावर जाण्याची शक्यता आहे. २४० दिवसांपेक्षा अधिक काळ कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे साडेबारा हजार रुपये बोनस बंधनकारक असल्याने त्यासंदर्भात माहिती मागविल्याचे सिटीलिंक कंपनीचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.