Amazon

नाशिक: बाजारपेठेतील गर्दीमुळे सिटीलिंक बसच्या ‘या’ मार्गांत बदल

नाशिक। दि.५ नोव्हेंबर २०२६: दहीपुल, दिवाळीमुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, सांगलीबँक सिग्नल, अशोकस्तंभ, शालीमार, मेनरोड, नेपाळी कॉर्नर याठिकाणी दिवाळी सणाचे खरेदी-विक्रीसाठी नागरिक, व्यवसायिक व त्यांचे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सिटीलिंक बसेस साठी मार्ग काढणे जिकरीचे ठरत असून या मार्गावर वाहनाची कोंडी होते. सिटीलींकच्या मुख्य बाजारपेठेतील मार्गात बदल करण्यात आले आहे. हे बदल ५ ते ११ नोव्हेंबर या कालावधीसाठी अमलात आणले जातील. नियम अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पाच मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; एफडीएची कारवाई

असे आहेत मार्गात बदल
प्रवेश बंद मार्ग :
पंचवटी कारंजा-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-नेपाळी कॉर्नर-शालीमार या मार्गावर सिटीलिंक बस व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग: दिंडोरी नाका (निमाणी)-पेठ फाटा-मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-अशोकस्तंभ-सिद्धेश्वर मंदिर-रामवाडी मार्गे जातील. पंचवटीकडे जाणाऱ्या बसेस: सीबीएस-अशोकस्तंभ-चोपडा लॉन्स-जुना गंगापूर नाका-बायजाबाई छावणी-मखमलाबाद नाका-पेठ फाटा-दिंडोरी नाका. दिंडोरी नाका-काट्या मारुती सिग्नल-संतोष टी पॉइंट-कन्नमवार पूल-द्वारका सर्कल-मुंबई नाका सर्कल मार्गे जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790