नाशिक (प्रतिनिधी): केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांना शनिवारपासून (दि. १५) सुरुवात होत आहे. शहरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.
यंदा राज्य मंडळाप्रमाणे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा देखील दहा ते पंधरा दिवस आधीच घेण्यात येत आहे. तर आतापर्यंत चित्रकला, संगीत या विषयाचे पेपर आधी होत असे. यंदा मात्र इंग्रजी, इतर भाषा आणि महत्त्वाचे विषय आधी होत आहे. या परीक्षेसाठी देण्यात आलेले सर्व नियम विद्यार्थ्यांनी पाळणे अनिवार्य आहे.
सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीटदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी cbse.gov.in संकेतस्थळ पाहता येईल. पेपरला येताना ड्रेसकोड अनिवार्य असल्याचे शहरातील परीक्षा समन्वयकांनी सांगितले. सकाळी १०:३० ते १:३० पेपरची वेळ आहे. पेपरच्या एक तास आधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असून, वेळ पहावी, असेही सूचित केले आहे.