Burning Car: शिर्डीहून दर्शन घेऊन परततांना महामार्गावर होंडा सिटीने घेतला पेट…

शिर्डीहून दर्शन घेऊन परततांना महामार्गावर होंडा सिटीने घेतला पेट…

नाशिक (प्रतिनिधी): शिर्डी येथून दर्शन घेऊन परतत असतांना एका भाविकाच्या कारला अचानक आग लागली.

ही कार नाशिकच्या व्यक्तीची असल्याचे समजते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नाशिकच्या होलाराम कॉलनीत राहणारे नरेश वालेचा यांची ही होंडा सिटी कार असल्याचे कळते.

त्यांचे नातेवाईक कुमार विधानी आपल्या पत्नी सोबत ही कार घेऊन शिर्डी येथे दर्शनाला गेले होते.

शिर्डी येथून दर्शन घेऊन सायंकाळी नाशिककडे परत येत असताना नाशिकरोड चेहेडी शिव परिसरात सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास गाडीत आग लागल्याचे पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाने सांगितले. तात्काळ कुमार विधानी यांनी होंडा सिटी कार बाजूला घेऊन पत्नी सोबत गाडीतून बाहेर पडले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि ही होंडा सिटी कंपनीची कार MH 02 VJ 9987 पूर्णपणे जळाली. शॉट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790