Breaking News: नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला!
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई, पुणे, ठाणे आणि औरंगाबादपाठोपाठ आता नाशिकमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केलाय.
त्यामुळे नाशिककरांना मात्र चांगलीच धडकी भरलीये.
तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरासह आरोग्य यंत्रणांकडूनही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी धावपळ सुरू झालीये.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील काही संशयित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील एका पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा व्यक्ती असिम्पोटमॅटिक असून, त्याची प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय त्यांनी म्हंटलं आहे की, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु या व्हेरिएंटच्या प्रसाराची गती विचारात घेता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची सर्व तत्व स्वतःहूनच व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला!
धक्कादायक: नाशिकमध्ये प्राणायाम करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिकच्या सायबर विभागाचं यश: ऑनलाइन गंडविलेले 40 हजार महिलेला परत
7 Total Views , 1 Views Today