Breaking News: नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून लाखोंची रोकड गायब

Breaking News: नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून लाखोंची रोकड गायब

नाशिक (प्रतिनिधी): भारत सरकारच्या नाशिकरोड येथील जेलरोड भागात असलेल्या चलार्थपत्र मुद्रणालयातून सुमारे पाच लाखांची रोकड चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार चार महिन्यानंतर उजेडात आला आहे. पाचशेच्या चलनी नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे मुद्रणालय व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला जात होता. तसेच अंतर्गत चौकशी समिती गठीत करत तपास केला जात होता. दरम्यान, रोकड मिळून न आल्यामुळे अखेर चौकशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सुत्रे फिरविली. पाचशेच्या नोटांचे बंडलमध्ये पाच लाखांची रोकड गहाळ झाली की चोरी याचा तपास सुरु केला. दरम्यान, बहुतांश कर्मचाऱ्यांची चौकशीदेखील करण्यातआली. तसेच जाबजबाबही घेतले गेले. इमारतीच्या आवारात नोटांच्या बंडलचा शोधही घेतला गेला; मात्र कोठेही नोटांचे बंडल मिळून आले नाही.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

दरम्यान, गेली पाच महिने मुद्रणालयाच्या फॅक्ट फाइन्डींग समितीकडून याबाबत तपास केला जात होता. या समितीने सर्व चौकशी पुर्ण करत त्यांचा चौकशी अहवाल उपनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा सादर केला. तसेच मुद्रणालयातून पाच लाखांच्या रोकडचा अपहाराबद्दल तक्रार अर्जही दिला असून यासंदर्भात चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची कडक सुरक्षाव्यवस्था असतानासुध्दा अशाप्रकारे इतकी मोठी रक्कम मुद्रणालयातून कशी गायब झाली? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती. मुद्रणालयाच्या सुरक्षाव्यवस्थेला या घटनेमुळे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.  

मुद्रणालयात छापल्या जाणाऱ्या भारतीय चलनाच्या नोटांपैकी पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे १० बंडल फेब्रुवारी महिन्यापासून गायब झाले आहेत. ही रोकड सुमारे पाच लाख रुपयांच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे. कडक सुरक्षाव्यवस्था भेदून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम कशी लांबविली गेली? याचा शोध मात्र पाच महिने उलटूनही गोपनीयरित्या सुरु असलेल्या चौकशी समितीला लागू शकलेला नाही. दरम्यान, आता हे प्रकरण उपनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

“करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी केली आहे. फॅक्ट फाईन्डींग कमिटीकडून मागील काही महिन्यांपासून गहाळ झालेल्या पाच लाखांच्या रोकडचा शोध घेतला जात आहे. कर्मचाऱ्यांचे जबाबही या समितीने नोंदविले आहे. रोकडचा तपास लागलेला नाही. समितीचा चौकशी अहवाल आणि तक्रार अर्जावरुन उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पुढील तपासाला दिशा दिली जात आहे.” -विजय खरात, पोलीस उपायुक्त, नाशिक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790