नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Breaking: हातात बंदूक, तोंडावर रुमाल; अडीच लाख घेऊन चोरटे फरार, पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
नाशिक (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या अज्ञात तीन दरोडेखोरांनी चोरी केली.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दिवसभरातील पेट्रोल डिझेल व ऑइलचे जमा झालेले दोन लाख पन्नास हजार 747 रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत चालली आहे. चोरी, लूटमार अशा घटना सातत्याने घडत आहेत. सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्यासाठी आव्हान उभे राहिले आहे.
- नाशिक: दुचाकी पार्किंगच्या वादावरून एकास बेदम मारहाण
- नाशिक: घरातील लाईट दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यास बेदम मारहाण
अशातच काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 अज्ञात दरोडेखोर मोटर सायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले. आणि थेट केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत अडीच लाखांची रोकड लांबवली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे साकुर जवळील घारगाव गावातील एका इसमाला धाक दाखवत त्याची दुचाकी सुद्धा याच चोरट्यांनी लांबवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील साकूर-मांडवे रोडवर भगवान पेट्रोल पंपावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 अज्ञात दरोडेखोर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले होते. त्यावेळी पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असताना ते तिघे अज्ञात दरोडेखोर केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत तुझ्याकडे असणारे सर्व पैसे आम्हाला दे नाही, तर गोळी घालून मारून टाकण्याची धमकी दिली.
तर दुसर्याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसर्याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. पंपावरील कर्मचारी चोर चोर असे मोठ्याने ओरडल्यामुळे आसपासचे नागरिक पंपाकडे धावले, तर गिरे यांनी या घटनेची माहिती पंपाचे मालक आदिक खेमनर आणि मॅनेजर दत्ता शेंडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.