Breaking: सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या भयानक अपघातात नाशिकच्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

Breaking: सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या भयानक अपघातात नाशिकच्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात दोन ते तीन कारमध्ये हा अपघात झाला असून त्यात ५ जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. संगमेनरकडून नाशिककडे स्विफ्ट डिझायर कार येत होती. मात्र, या कारचा टायर अचानक फुटलं. त्यावेळी कार भरधाव वेगात होती.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्यामुळेच ही कार अनियंत्रित झाली. परिणामी, डिव्हायर तोडून ही कार थेट पलिकडच्या रस्त्यावर गेली. यावेळी कारने समोरुन येणाऱ्या काही वाहनांना जोरदार धडक दिली.

इनोव्हासह काही कारला ही जबर धडक बसली. या अपघातात स्विफ्ट कारमधील ५ जण ठार झाले आहेत. त्यात दोन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे. हे पाचही केटीएचएम कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, हे सर्व विद्यार्थी नाशिक शहरातील सिडको परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. हे सर्वजण विवाहा समारंभासाठी गेले होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

हा अपघात एवढा भीषण होता की मोठा आवाज झाला आणि कार एकमेकावर आदळल्या. अपघात होताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तातडीने काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सिन्नरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

या अपघातात वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. मृत विद्यार्थ्यांमध्ये हरीश बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे (अन्य दोन मृतांची ओळख पटणे बाकी आहे) यांचा समावेश आहे. तर, गायत्री फड, साक्षी घाळा, साहिल वरके, सुनिल दत्तात्रय दळवी आणि अन्य काही जण जखमी आहेत. दरम्यान, जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंतानजक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790