Breaking: नाशिकच्या ‘हॉटेल एक्सप्रेस इन’मध्ये वेटरने उचललं टोकाचं पाऊल…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मधील अलिशान हॉटेल म्हणून ओळख असलेले आणि जवळपास सर्वच नेते मंडळीचा देखील ज्या हॉटेलमध्ये मुक्काम असतो, अशा पांडवलेणी जवळील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सध्या नाशिकमध्ये चर्चा सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मूळचा साताऱ्याचा असलेला अतुल करंडे हा 29 वर्षीय तरुण एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
दरम्यान सोमवारी पहाटे त्याने हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी हे बघताच तात्काळ त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले.
मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आत्महत्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकच्या पाथर्डी परिसरात एक्सप्रेस इन हे हॉटेल असून येथे नेहमीच राज्यातील मंत्री, नेते, पदाधिकारी यांचा राबता असतो. नाशिक शहरात टॉप हॉटेल्सपैकी एक हॉटेल म्हणून ओळख असलेल्या एक्सप्रेस इन मध्ये ही घटना घडली आहे. या हॉटेलात वेटर म्हणून काम करणारा अतुल काही महिन्यांपासून नोकरीस होता. काल रात्री साडे बारा वाजेच्या त्याने हॉटेल एक्सप्रेस इनच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी एक्सप्रेस इन हॉटेलच्या स्टाफ मेंबर अजित वाळीबा सांगळे यांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पीटल नाशिक येथे दाखल केले असता डॉ शिंदे मँडम यांनी तपासून मयत घोषीत केले.