नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील भोजापुर खोरे चास येथील काही तरुण देवदर्शनासाठी गेले होते. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना ते ज्या वाहनातून जीपने जात होते, त्या गाडीचे टायर फुटून भरधाव जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्यामुळे या भीषण अपघातात चास येथील तिघेजण ठार झाले, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.
सदर घटना मंगळवारी सकाळी सहा तीस वाजता सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी नजीक घडली.
या वाहनात सिन्नर तालुक्यातील चास येथील भाविक होते. मरण पावलेल्यांत निखिल रामदास सानप (24), अनिकेत बाबासाहेब भाबड ( 24 ), अर्थव शशीकांत खैरनार ( 26 ) यांचा समावेश आहे गंभीर जखमी झालेल्या भाविकांमध्ये तुषार दत्तात्रय बिडगर( 24) ( 27 ) दिपक बिडगर दोघे गंभीर जखमी तर किरकोळ जखमी पंकज खैरनार, गणेश खैरनार, जीवन ढाकणे, शंकर भाबड हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सर्व जखमी सिन्नर तालुक्यातील चास रहिवासी आहेत. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सही भुरे पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून जखमींना सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या
- नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक
सोमवारी हे आठ तरुण देवदर्शनासाठी सिन्नर तालुक्यातील चास गावातुन गेलेले होते अतिशय जीवभावाचे हे मित्र असल्याचे पंचक्रोशीत सांगण्यात येत आहे मंगळवारी नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. देवदर्शनासाठी जात असताना सोलापूर तुळजापूर येथील महामार्गावरील तामकलवाडी परिसरात या भाविकांचे गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात तीन तरुणांच्या या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताचे वृत्त तालुक्यातील चास या गावात समजताच गावातील वातावरण शोकाकुल झाले होते. अतिशय जिवाभावाचे तीन मित्र हे अपघातात मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत शांतता पसरली होती. अपघातातील जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.