Breaking: डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरण; पती संदीप वाजेला ग्रामीण पोलिसांकडून अटक !

Breaking: डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरण; पती संदीप वाजेला ग्रामीण पोलिसांकडून अटक !

नाशिक (प्रतिनिधी): महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरणी त्यांचे पती संदीप वाजे यांना अटक करण्यात आली आहे..

डॉ. वाजे मृत्यूप्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळालेल्या अवस्थेत डॉ. वाजे यांचा मृतदेह गाडीत मिळून आला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्यांची तपासाची चक्रे फिरवली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना सुद्धा होता. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली. या प्रकरणाचा आता उलगडा झाला असून डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे यांच्यासह त्यांच्या अजून काही साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790