BREAKING: नाशिक: SMBT कॉलेजच्या बसला अपघात; २५ हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी

BREAKING: नाशिक: SMBT कॉलेजच्या बसला अपघात; २५ हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (4 फेब्रुवारी) सकाळी मिरची हॉटेलच्या सिग्नलवर ट्रक आणि खाजगी कॉलेज बस यांच्यात अपघात झाला आहे.

ही खाजगी बस SMBT कॉलेजची असल्याचं समोर आलं आहे. या बसमध्ये विद्यार्थी आणि कॉलेजचे कर्मचारी असल्याचं समजतंय.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव येथील SMBT कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन  कॉलेजची बस (MH 15 EF 2526)  जात होती.

नाशिक औरंगाबाद महामार्गावरील तपोवन जवळील हॉटेल मिरची जवळील चौफुलीवर बस आली होती. याच वेळी औरंगाबाद कडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कॉलेजच्या बसला जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकेत बस पलटी झाली. यावेळी मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिक घटना स्थळी दाखल झाले.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

महत्वाचे: Breaking: डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरण; पती संदीप वाजेला ग्रामीण पोलिसांकडून अटक !

या अपघातात बस मधील 20 ते 22 विद्यार्थी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790