Breaking: सुरज मांढरे यांची बदली; गंगाधरन डी नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गंगाधरन डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज प्राप्त झालेल्या आदेशानुसार डॉ. संजय चहांदे, ए एम लिमये, एसए तागडे, श्रीमती आभा शुक्ला, डॉ अमित सैनी, आरएस जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन या नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये गंगाधरन देवराजन यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये गंगाधरन वसई विरार महापालिकेचे आयुक्त असताना त्यांची नाशिकला बदली झाल्याची जोरदार चर्चा मुंबईसह परिसरात होती.
कापडणीस पिता-पुत्र हत्याकांड: जगतापच्या या तीन साथीदारांना अटक; पोलिसांनी केला अजून एक खुलासा
त्यानंतर त्यांची मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदी बदली करण्यात आली होती. गंगाधरन देवराजन हे २०१३ सालचे आयएएस अधिकारी आहेत. सुरज मांढरे यांची कुठे बदली झाली आहे. याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.