नाशिक शहरातील या नामांकित शाळेत विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील एका नामांकित शाळेत विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक शहराजवळील चांदशी येथील नामांकित अशा अशोका युनिवर्सल स्कुलमध्ये नववीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडालीये.
या विद्यार्थ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची टेस्ट करण्याची सूचना आरोग्य विभागाने पत्राद्वारे दिली.
त्यानंतर शाळेने ताबडतोब सुरक्षेचा उपाय म्हणून वर्गातील सर्व 67 मुलांची कोरोना टेस्ट केली आहे.. सोबतच शाळेतील नऊ शिक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामीण आरोग्य यंत्रणेने आता या कोरोनाचा स्रोत शोधण्यास सुरुवात केलीये. तर येत्या 2 दिवसात यांचे अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त होणार असल्याचं समजतंय. सदर रिपोर्ट मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात यावी अशी सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी शाळेला दिली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव आश्रम शाळेत कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यामुळे नाशिक शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यास दहा दिवसांचा उशीर केला होता. नाशिक शहराजवळील चांदशी परिसरात ही शाळा असल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेसह नाशिक शहरातील शिक्षण मंडळ आणि महापालिका आरोग्य विभाग त्यामुळे सतर्क झाला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: नाशिकला चाकूचा धाक दाखवत विवाहितेवर बलात्कार