नाशिक: सिटी सेंटर मॉलजवळ दुभाजकाला दुचाकी आदळून २० वर्षीय युवक ठार

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळीसाठी निघालेल्या कामगाराची दुचाकी दुभाजकाल आदळली आणि या अपघातात दुचाकीस्वार कामगार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सदरची घटना मध्यरात्री एबीबी सर्कल ते लवाटेनगर या रस्त्यावर घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

विशाल अभिमान मासूळ-पाटील (२०, रा. डीजीपी नगर-१, आंबेडकरनगर, पुणे रोडजवळ, मूळ रा. चित्तोड, जि. धुळे) असे मृत युवकाचे नाव आहे.

विशाल हा रविवारी (ता. १३) मध्यरात्री दीड वाजता डीजीपीनगर येथून सातपूर एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळी ड्युटीसाठी दुचाकीने (एमएच १५ बीडब्ल्यू ०७१५) निघाला होता. तो उंटवाडी सिग्नलकडून सिटी सेंटर मॉलच्या रस्त्याने जात असताना, मूहुर्त शोरूमसमोरील दुभाजकावर त्याची दुचाकी जाऊन आदळली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

या अपघात गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून होता. ही घटना गंगापूर पोलिसांना कळताच पोलिस शिपाई एस. जी. पवार यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका यंत्रणेस संपर्क केला.

यावेळी उपनिरीक्षक मुंढे, हवालदार रामदास खुळात दाखल झाले. त्यांनी विशाल याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पगार यांनी तपासून मृत घोषित केले. तपास हवालदार खुळात करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790