नाशिक (प्रतिनिधी): मनमाड मध्य रेल्वेच्या भुसावळ वाणिज्य विभागास ऑक्टोबर २०२३ मध्ये १२०.९६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
विभागीय रेल व्यवस्थापक इति पांडेय यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने हा महसूल प्राप्त केला.
प्रवासी वाहतूकमधून ६७. ९३ कोटी रुपये, माल वाहतूक ४३.५४ कोटी, पार्सल वाहतूक ७.२८ कोटी, तिकीट तपासणी विभाग ७४ हजार केसेसमधून ५.६४ कोटी, पार्किंग ५४.३३ लाख, वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर २७.७० लाख, खानपान विभाग ९१.५५ लाख, भुसावळच्या वाणिज्य विभागाची फुटकर राशी ४८.२२ लाख आहे.
ऑक्टोंबर महिन्यात प्रवाशांसाठी सुविधांत बोदवड स्टेशन येथे पादचारी पुलाचे कार्य पूर्ण करण्यात आलेल्या असल्याची माहिती मंडळ रेल प्रबंधक कार्यालयातून देण्यात आली.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790