महत्वाची बातमी: भुसावळ विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मथुरा रेल्वे स्टेशनमध्ये यार्ड रिमॉडलिंगचे काम होणार आहे. त्यासाठी काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत. त्यामध्ये भुसावळ विभागातील समावेश आहे.

गाड्यांचा रद्द केलेल्या गाड्या व त्यांचा कालावधी : दादर- अमृतसर एक्स्प्रेस (२० जानेवारी ते ३ फेब्रुवारी), अमृतसर-दादर एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (३० जानेवारी), हजरत निजामुद्दीन- कोल्हापूर एक्स्प्रेस (१ फेब्रुवारी). मुंबई एलटीटी-हरिद्वार सुपर एक्स्प्रेस (२२ जानेवारी ते १ फेब्रुवारी), हरिद्वार ते एलटीटी ( २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी), यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते १ फेब्रुवारी), हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी)

त्याचप्रमाणे नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (२१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी), अमृतसर- नांदेड सचखंड एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), नांदेड-जम्मू तवी हमसफर एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते २ फेब्रुवारी), जम्मू तवी-नांदेड हमसफर (२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी). नांदेड- हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस (२३ ते ३० जानेवारी), हजरत निजामुद्दीन- नांदेड संपर्कक्रांती (२४ ते ३१ जानेवारी), शिर्डी-कालका एक्स्प्रेस (२७ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), कालका-शिर्डी एक्स्प्रेस (२५ जानेवारी ते ४ फेब्रुवारी), भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (२८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी) या गाड्यांचाही समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790