फुकट 5G चे दिवस संपले? एअरटेल युजर्सना महिनाभरात मिळणार ‘इतकाच’ अनलिमिटेड 5G Data

भारती एअरटेलनं आपल्या 5G यूसेजच्या नियम व अटी जाहीर केल्या आहेत. टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) नं टेलीकॉम कंपन्या Jio आणि Airtel ला त्यांच्या ५जी अनलिमिटेड सर्व्हिस पॉलिसीचे नियम स्पष्ट शब्दांत मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एअरटेलनं आपल्या ५जी अनलिमिटेड सर्व्हिस बाबत सांगितलं आहे की 5G अनलिमिटेड डेटा एअरटेल युजर्सना एक कॉम्पलिमेंट्री बेनिफिट म्हणून देण्यात आला आहे, परंतु ह्या सर्व्हिसच्या काही अटी देखील आहेत.

Airtel नं 5G अनलिमिटेड यूसेज पॉलिसी बाबत पुढे म्हटलं आहे की ही सर्व्हिस फक्त खाजगी वापर आणि नॉन-कमर्शियल यूजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे सर्व्हिसचा व्यावसायिक वापर करता येणार नाही. ह्यासाठी कंपनीनं दरमहिन्याला (३० दिवसांसाठी) ३००जीबी पर्यंतची मर्यादा ठरवली आहे. जर ह्यापेक्षा जास्त एखाद्या सब्सक्रायबरनं डेटा वापरला तर तो कमर्शियल वापर समजला जाईल.

Vi नं केलेली तक्रार:
काही दिवसांपूर्वी वोडाफोन आयडियानं टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) कडे तक्रार केली होती की, Jio आणि Airtel ह्या टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या 5G सर्व्हिसची किंमत ठरवली पाहिजे. त्यानंतर TRAI च्या निर्देशाचे पालन करत एअरटेलनं आपल्या 5G पॉलिसी बद्दल हा अपडेट जारी केला आहे.

अधिकृतपणे स्टेटमेंट जाहिरात करत कंपनीनं वेबसाइटवर देखील पॉलिसी स्पष्ट केली आहे त्यानुसार, ”Unlimited 5G डेटा एअरटेल युजर्ससाठी एक इंट्रोडक्ट्री ऑफर आहे, ज्यात युजर्स ५जी ची पावर अनुभवू शकतात. असे युजर्स ज्यांच्याकडे ५जी इनेबल्ड डिवाइसेज आहेत आणि जे Airtel 5G Plus नेटवर्कशी जोडले गेले आहेत, ते योग्य प्रीपेड प्लॅन अंतगर्त अनलिमिटेड ५जी सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. ”

कोणत्या प्लॅनमध्ये मिळतं अनलिमिटेड 5जी?:
एअरटेलचे प्लॅन जे २३९ रुपयांपासून सुरु होतात त्यात अनलिमिटेड ५जी डेटा मिळत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ह्यावरील सर्व प्रीपेड प्लॅन्समध्ये ग्राहक अनलिमिटेड ५जी सर्व्हिस मिळवू शकतात आणि सर्व्हिसचा आनंद घेऊ शकतात. एअरटेलनं आपली ५जी सर्व्हिस ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरु केली होती. एअरटेलसह Jio नं देखील आपल्या ५जी डेटा यूसेज पॉलिसी बद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790