बीबीएनजी आंतरराष्ट्रीय परिषद 4 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये

उद्यम कौस्तुभ व जीवन गौरव पुरस्कारार्थींची घोषणा.

नाशिक – ब्राह्मण व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबीएनजी ) तर्फे 8 वी आंतरराष्ट्रीय परिषद परिवर्तन ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉल येथे होणार असून या परिषदेसाठी जगभरातील नामवंत ब्राह्मण उद्योजक  व वक्ते येणार असल्याची माहिती बीबीएनजी चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली .

या नामवंत  वक्त्यांमध्ये गीतांजली किर्लोस्कर (चेअरपर्सन & एम.डी. – किर्लोस्कर सिस्टीम(प्रा) लि.) , रवींद्र साठे ( चेअरमन –महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ) सुनील देवधर ( जेष्ठ नेते –भारतीय जनता पार्टी,) डॉ.अशोक जोशी (संस्थापक ,मायक्रोलीन एलएलसी,साल्ट लेक सिटी,अमेरिका) ,योगेंद्र पुराणिक( गॅझेटेड नागरी सेवा अधिकारी,माजी आमदार,जपान) ,उदय निरगुडकर( संचालक NHPC), आनंद गानू ( अध्यक्ष,गर्जे मराठी ग्लोबल एल एल सी, अमेरिका), गिरीश चितळे (संचालक चितळे डेअरी), डॉ.संजय पैठणकर- दुबई, डॉ.विजय जोशी ( D R S कन्सल्टिंग ,सिडनी, ऑस्ट्रेलिया), संजय लोंढे ( अशोक बिल्डकॉन ) , विश्वास पाठक (संचालक महावितरण ) विवेक देशपांडे ( रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर ) ,सुमित तिवारी ( टायमस) ,शरयू देशमुख ( डेल्टा फिनाकेम), अनिल जोशी ( जैन इरिगेशन) ,विष्णू मनोहर ( सुप्रसिद्ध शेफ ), मंगेश गोंदवले- (व्यवस्थापकीय संचालक, MAIDC ), अतुल कुर्लेकर –(संचालक, लोड स्टार कम्युनिकेशन्स ) ,अभिजित जोग –( सीएमडी,प्रतिसाद अॅडव्हरटायझिंग, ) ही प्रमुख आहेत .हे वक्ते उद्योगाशी संबंधित अश्या विविध पैलूंवर संवाद साधतील

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

या शिवाय दरवर्षी बीबीएनजी  तर्फे  उद्योगांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांचा गौरव करण्यात येतो . या वर्षी खालील उद्योजकांना गौरवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

जीवन गौरव पुरस्कार:
1)सीमा किणीकर (सोलापूर),  2) डॉ.रघुनाथ शुक्ला  (शास्त्रज्ञ, एन सी एल ,पुणे)

उद्यम कौस्तुभ पुरस्कार :
1)कुमार काळे- (नागपूर) 2)आर्की.प्रज्ञा पोंक्षे- (मुंबई), 3)रवळनाथ शेंडे- (कराड) 4)गोविंद झा – (नाशिक )

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

5)डॉ.रणजीत जोशी –(विम्बल्डन,लंडन व नाशिक) 6)डॉ.संजय पैठणकर-(दुबई)

उद्योजकांचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान असून देशाचे अर्थकारण व रोजगार निर्मिती मध्ये देखील उद्योजकांची महत्वाची भूमिका असते . या परिषदेचा उद्देश व्यवसायाच्या वाढीसाठी विचारमंथन तसेच उद्योजकता विकास असून

 विविध उद्योजकांना भेटण्याच्या आणि नेटवर्कच्या संधींद्वारे व्यवसाय वृद्धी च्या संधी मिळवणे असा आहे. परिषदेमध्ये नवनवीन उत्पादनांचे लाँचिंग व उद्योजकीय कौशल्यांचे प्रदर्शन देखील होणार आहे. अधिक माहिती साठी 9822753226 येथे संपर्क साधावा असे आवाहन परिवर्तन परिषदेचे प्रमुख डॉ.अभिजीत चांदे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790