नाशिक: सहायक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांना वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्समध्ये सुवर्णपदक !

नाशिक। दि. २५ जुलै २०२५: सहायक पोलीस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांनी २६ जून २०२५ ते ०७ जुलै २०२५ या दरम्यान बर्मिंगहम, अलाबामा, यु.एस.ए येथे पार पडलेल्या ‘२१ व्या जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत १० मी. एअर पिस्टल शुटींग या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त करून भारतीय पोलीसांचे जागतिक स्थरावर नावलौकीक प्राप्त केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: जीएसटी गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई; सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा !

सदर स्पर्धेमध्ये ९० देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सन १९६१ पासून सदर खेळ प्रकारात पहिलेच सुवर्ण पदक असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी ही अतिशय अभिमानाची व गौरवास्पद बाब आहे.

👉 हे ही वाचा:  श्रावण मासारंभ: कपालेश्वर, सोमेश्वर मंदिरात भाविकांना पहाटे ४ पासून रात्री ११ पर्यंत दर्शन

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती मोनिका राउत, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांनी सहायक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांना जागतिक स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करून प्रोत्साहन दिले. सदर वेळी महाराष्ट्र राज्य पोलीस शुटींग संघाचे कॅप्टन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण व पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790