
नाशिक (प्रतिनिधी): अपोलो हॉस्पिटल्स नाशिक तर्फे जेष्ठ नागरिकांसाठी “सिनिअर्स फर्स्ट” या कार्यक्रमांतर्गत “सिनिअर्स फर्स्ट प्रिव्हिलेज कार्ड ” चे उदघाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या तर्फे करण्यात आले आणि २५ जेष्ठ नागरिकांना सदर कार्डचे वाटप करण्यात आले.
खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले ” अपोलो हॉस्पिटल्स नाशिक तर्फे “सिनिअर्स फर्स्ट” या नवीन संकल्पनेचे मी स्वागत करतो. नाशिक शहरात अनेक जेष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांची मुलं कामानिमित्त इतर शहरात वास्तव्यास आहेत, त्यांच्या आरोग्याबाबत च्या अनेक समस्या असतात, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी अपोलो ने पुढाकार घेतला आसून त्याचा फायदा नक्कीच जेष्ठ नागरिकांना होईल आणि त्यांच्या मुलांची आई वडिलांबाबत चिंता देखील कमी होईल”
अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड अजित झा म्हणाले की हॉस्पिटल मध्ये उपचार घेणारे किंवा डॉक्टरांकडे OPD करीत येणारे अनेक रुग्ण हे जेष्ठ नागरिक आहेत त्यांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेता आपण “सिनिअर्स फर्स्ट” हा कार्यक्रम सुरु केला आहे, काही आजार आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातच दिसून येतात, आयुष्याच्या शेवटच्या दोन दशकांत आजार होण्याचे प्रमाण जास्त असते, जेव्हा ज्येष्ठ नागरिक आजारी असतात तेव्हा तरुणांच्या तुलनेत बरे होण्याचा कालावधी जास्त असतो.
सीनियर्स फर्स्टच्या वैशिष्ट्यांमध्ये आरोग्याशी संबंधित प्रश्न आणि सेवा समन्वयासाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर 8956931872, मोफत रुग्णवाहिका , OPD मध्ये वृद्ध नागरिकांना प्रथम प्राधान्य तसेच डॉक्टरांतर्फे होम व्हिझिट सेवा देण्यात येणार आहे या सर्व सुविधा मिळण्यासाठी “सिनिअर्स फर्स्ट प्रिव्हिलेज कार्ड ” तयार करण्यात आले असून नावनोंदणी सुरु आहे. या कार्यक्रमामुळे ज्येष्ठांच्या आयुष्यातील सर्वात असुरक्षित काळात त्यांची काळजी घेतली जाऊ शकेल. या सामाजिक कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांच्या जास्तीत जास्त सहभागाकरिता हॉस्पिटल मधील OPD कन्सल्टेशन , रेडिओलॉजी आणि रक्त तपासण्या आणि फार्मसी मध्ये विशेष सूट देखील देण्यात येणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्सचे वैद्यकीय अधिक्षक आणि फिजिशियन डॉ.अभिषेक पिंप्राळकर म्हणाले कि बऱ्याच वेळा जेष्ठ नागिरकांच्या समस्या ऐकून घेतल्या तरी त्यांचा निम्मा आजार बरा होतो , जेव्हा जेष्ठ नागरिक OPD मध्ये येतात तेव्हा त्यांच्याशी बोलताना असं लक्षात येत कि धकाधकीच्या जीवनात घरातल्या जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला जात नाही, त्यांच्या छोट्या छोट्या समस्या आणि अडचणी आपण सहज सोडवू शकतो पण संवाद नसल्याने ते खचतात. अपोलो हॉस्पिटल तर्फे “सिनिअर्स फर्स्ट” या प्रग्राम अंतर्गत ज्या सुविधा आपण देत आहोत त्याचा फायदा वृद्ध नागरिकांना नक्कीच होईल आणि आरोग्याविषयी असणाऱ्या त्यांच्या समस्या सोडवता येतील आणिसर्व सोयी एकाच छताखाली असल्याने त्यांना त्रास देखील कमी होईल.
यावेळी ह्रदय शस्रक्रिया तज्ञ डॉ.अभय सिंग वालिया, फिजिशियन डॉ.शीतल गुप्ता,डॉ.राजश्री धोंगडे, रुग्णाचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंगेश जाधव यांनी केले.