नाशिक: अपोलो हॉस्पिटल्स नाशिकतर्फे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांचा गौरव

नाशिक। दु,३ जुलै २०२६: राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या वतीने फॅमिली फिजिशिअन्स असोसिएशन, निमा न्यू नाशिक , पंचवटी मेडिकोज असोसिएशन, पाथर्डी फाटा डॉक्टर्स असोसिएशन आणि लाड मेडिकोज डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डॉक्टर्स दिन सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील शेकडो डॉक्टरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अपोलो हॉस्पिटल्सच्या वतीने वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. संजय वेखंडे, युरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण गोवर्धने, मेंदूविकार तज्ञ डॉ. अतुल शुक्ल, सर्जन डॉ प्रशांत पाटील, सांधेरोपण तज्ञ डॉ. भूषण देशमुख आणि हार्ट सर्जन डॉ. अझहर सय्यद यांनी बदलत्या आरोग्यसेवा पद्धती, रुग्ण उपचारामधील प्रभावी संवादाचे महत्त्व, आधुनिक वैद्यकीय सेवांमधील आव्हाने तसेच फॅमिली फिजिशियन यांच्या आरोग्य व्यवस्थेतील अनन्यसाधारण योगदानावर मार्गदर्शन केले. वैद्यकीय व्यवसायातील अनेक प्रेरणादायी तसेच भावनिक अनुभवही त्यांनी उपस्थितांशी शेअर केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पावसाची रिपरिप; वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

विविध डॉक्टर संघटनांच्या अध्यक्ष व प्रतिनिधींनीही आपले विचार व्यक्त केले. निमा न्यू नाशिकचे डॉ. अभिनंदन कोठारी, फॅमिली फिजिशिअन्स असोसिएशन डॉ. विजय मुंदडा, पंचवटी येथील ज्येष्ठ डॉ. किरण भांडगे, डॉ शेखर सोमवंशी पाथर्डी फाटा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. हेमंत आवारे तसेच लाड मेडिकोज असोसिएशनचे डॉ. अविनाश बाविस्कर यांनी बदलत्या आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांमधील एकात्मता, परस्पर सहकार्य आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ करण्याची गरज अधोरेखित केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भाडेकरू बनून घरफोडी करणारे 'बंटी-बबली' अटकेत; बोईसरमधून जेरबंद, २४.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अपोलो हॉस्पिटल्स, नाशिकचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. दीप्तेंदू पांडा मेडिकल वैद्यकीय अधीक्षक डॉ. हृषीकेश कर्पे तसेच मार्केटिंग हेड श्री. देवेंद्र वाघ व डॉक्टर्स टीम यांनी उपस्थित डॉक्टरांना डॉक्टर्स दिनाच्या च्या शुभेच्छा देत वैद्यकीय व्यवसायाचे उदात्त स्वरूप अधोरेखित केले. डॉक्टर हे समाजाच्या आरोग्याचे, विश्वासाचे आणि मानवतेचे खरे आधारस्तंभ असून त्यांच्या समर्पित सेवेमुळेच निरोगी समाजाची उभारणी शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. ऋतुजा पाटील यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दोन संशयितांकडून अडीच लाखांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त; चार गुन्ह्यांची उकल

समारोपावेळी सर्व डॉक्टरांनी अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा व्यासपीठांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील संवाद, सहकार्य आणि स्नेह अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790