
नाशिक। दि. १८ ऑगस्ट २०२५: अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे मागील जुलै महिन्यात ६३ वर्षीय रुग्णाची लिव्हर ट्रान्सप्लांट शस्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. खारघर, मुंबई येथील ६३ वर्षीय रुग्ण हे मागील ६ महिन्यांपासून लिव्हर निकामी झाल्यामुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. परंतु नातेवाईकांमध्ये कोणाचाही रक्तगट सारखा नसल्याने कोणीही दाता होऊ शकले नाही.
यानंतर पेशंटचा अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे कॅडेव्हर लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी झेड. टी. सी. सी. पुणे येथे प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्यात आले होते. या दरम्यान पेशंटच्या वेळोवेळो तपासण्या करून पेशंटला औषधांवर ठेवण्यात आले. यानंतर प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी येथून ब्रेन डेथ रुग्णाचे लिव्हर झेड. टी. सी. सी. , पुणे यांच्या नियमानुसार अपोलो हॉस्पिटलच्या ६३ वर्षीय रुग्णाला देण्यात आले. १९ जुलै २०२५ रोजी पेशंटवर लिव्हर ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया तज्ञ् डॉक्टरांच्या टीमकडून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
अपोलो हॉस्पिटल नाशिक मधील डॉ. गुरुप्रसाद शेट्टी. डॉ. अमृतराज, डॉ. केतूल शहा, डॉ. मनोज भामरे, डॉ. अम्बरीन सावंत, डॉ. देवेन गोसावी, डॉ. सोहम दोशी तसेच डॉ. चेतन भंडारे आणि डॉ. भूपेश पराते तसेच आय. सी. यु. इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रवीण ताजणे, डॉ. अतुल सांगळे, डॉ. अमोल खोलमकर आणि डॉ. मृणाल या तज्ञ् टीमच्या अथक प्रयत्नाने लिव्हर ट्रान्सप्लांट ची शस्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटल नाशिकचे युनिट हेड अजित झा यांनी म्हटले कि “तज्ञ् डॉक्टरांची टीम, अद्ययावत साहित्य व तंत्र, तज्ञ् नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी वर्ग या टिममुळे लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात आली तसेच यामुळे अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे लिव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रम जलद गतीने वाढण्यास मदत होईल.”