नाशिक (प्रतिनिधी): ABP माझाचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्यावर शिर्डी संस्थांकडून गुन्हा दाखल केल्या प्रकरणी आज नाशिकच्या पत्रकार संघटनांकडून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे..अनलॉकनंतर शिर्डी संस्थान येथे दर्शनाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याबाबत मुकुल कुलकर्णी यांनी वार्तांकन केले होते.
एबीपी माझाचे पत्रकार मुकुल कुलकर्णी यांच्यावर शिर्डी संस्थान कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता शिर्डी संस्थांकडून दाखल करण्यात आलेल्या ह्या गुन्ह्याच्या विरोधात सर्वच स्तरावरून आता निषेध नोंदविला जात आहे. नाशिकमध्ये देखील ह्या प्रकरणी पत्रकार प्रसार माध्यम आणि वृत्तपत्र संघटनांच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देऊन ह्या प्रकरणी योग्य ती दखल घेऊन तात्काळ गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे…
ह्या प्रकरणी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र नोव्हेंबर 2020 रोजी केलेल्या वृत्तांकनाबाबत शिर्डी संस्थांनला आता जाग कशी आली? तर शिर्डी संस्थांकडून हेतुपुरस्कर म्हणून ABP माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी गुन्हा दाखल केला असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.