नाशिकमध्ये गंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण (Video)

नाशिकमध्ये गंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण (Video)

नाशिक (प्रतिनिधी): यजमान पळवण्याच्या वादातून पंचवटीत गंगाघाटावर पुरोहितांमध्ये तुंबळ भांडण झाले. यामुळे दशक्रिया व इतर विधींसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.

नाशिक येथे दक्षिण गंगा गोदावरी दक्षिण वाहिनी होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

त्यामुळे पितरांच्या पिंडदानासाठी नाशिकच्या रामघाटाचे मोठे महत्व आहे.

यामुळे येथे राज्यभरातून भाविक पूर्वजांच्या पिंडदान विधीसाठी येत असतात. तसेच अस्थिविसर्जनासाठीही हिंदूंच्या दृष्टीने रामघाटाचे मोठे महत्व आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी पुरोहितांची वतने ठरलेली आहेत. मात्र, बऱ्याचदा नियम मोडून एकमेकांचे यजमान पळवण्याचे प्रकार घडत असतात. तसाच प्रकार सोमवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

यावेळी दोन पुरोहितांमध्ये मोठमोठ्या आवाजात झालेल्या भांडणामुळे गंगाघाटावर विधीसाठी आलेले भाविक तेथे जमा झाले होते. जवळपास अर्धातास हे भांडण सुरू होते. त्र्यंबकेश्वर येथेही यजमान पळवण्यावरून नेहमीच वाद असताना दोन महिन्यांपूर्वी त्या वादाचे पर्यावसान नाशिक येथे एकमेकांवर धारदार शस्त्र व घातक शस्त्राने वार करण्यापर्यंत मजल गेली होती.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here