नाशिक: एनडी पटेल रोडवर डांबराने भरलेला ट्रक उलटला; एक मजूर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील एनडी पटेल रोडवर मंगळवारी (दि. 8 फेब्रुवारी २०२२) दुपारच्या सुमारास डांबरने भरलेला ट्रक उलटला.
या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला आहे.
घटनास्थळी भद्रकाली पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
नाशिक शहरात सध्या स्मार्ट सिटीचे अंतर्गत गॅस पाईप लाईनच काम सुरू आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात येत आहेत. हेच खोदलेले खड्डे बुजविण्यासाठी डांबर ने भरलेला एक ट्रक एन डी पटेल रोड येथे आला. खड्डे बुजविलेल्या ठिकाणी हा ट्रक उभा होता. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने हा वजनदार ट्रक खड्ड्यात दाबला गेला. म्हणजे खड्डे बुजविण्यासाठी आलेला ट्रकच ह्या खड्ड्यात अडकून पलटी झाला आहे. ह्या ट्रकमध्ये डांबर होतं. हेच डांबर एका मजुरावर पडलं आणि मजूर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिक: तलवार दाखवून घरात धुडगूस घालणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड
शहरात झालेला हा प्रकार स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा दर्जा सांगतो. आज झालेल्या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी महानगर पालिकेने शहरात सुरू असलेल्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज आहे.