महाराष्ट्र आणखी गारठणार! येत्या २४ तासांत ‘या’ भागात थंडीची लाट
मुंबई (प्रतिनिधी): राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.
तसेच येत्या २४ तासांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
याबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भातील बुलडाणा आणि नागपुरातील तापमान ९ अंशापर्यंत खाली आलं होतं. पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी असेल.
ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिक मनपा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला
नाशिक: PhonePe द्वारे अशी केली गेली या व्यापाऱ्याची दीड लाखाची फसवणूक