नाशिक: मानापानाने लग्न लावून दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ
नाशिक (प्रतिनिधी): मानापानाने व मोठ्या हॉटेलमध्ये लग्न लावून दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता दि. 25 जून 2020 ते 12 मे 2021 या कालावधीत सासरी नांदत होती.
त्यावेळी पतीसह सासरच्या चार नातेवाईकांनी छोट्या-छोट्या गोष्टींवरून विवाहितेला मोठ्या हॉटेलमध्ये लग्न लावून दिले नाही या कारणावरून आणि,
विवाहितेस माहेरी जायचे नाही, तुझ्या घरच्यांशी नाते तोडून टाक, तू फारकत दे, आमच्या मुलाला दुसरी बायको करून देऊ, असे म्हणून मानसिक त्रास देऊन मारहाण केली. तसेच फिर्यादी विवाहितेच्या वडिलांना तुमची मुलगी व्यवस्थित राहत नाही, असे म्हणून ती व्यवस्थित नांदेल, आत्महत्या करणार नाही, असे लिहून द्या, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती धात्रकसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांना हुडहुडी; नाशिकमध्ये तापमानाचा पारा इतका घसरला
नाशिक: डोक्यात बियरची बाटली फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न