नाशिक: डोक्यात बियरची बाटली फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संशयित आरोपी यश राजेंद्र शिंदे (वय 21, रा. नागसेननगर, वडाळा नाका, नाशिक), राहुल पवार, सनी जगताप, सुजल शिंदे ऊर्फ गट्ट्या, रवी गायकवाड व किशोर महाले यांनी संगनमत करून मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी मिलिंद मनोहर भालेराव (रा. नागसेननगर, वडाळा नाका याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यावर व अंगावर कोयत्याने वार केला व बिअरची बाटली डोक्यात फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी यश शिंदे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.