जबरदस्त निर्णय: नाशिककरांनो आता नायलॉन मांजा वापराल तर जेलमध्ये जाल !

जबरदस्त निर्णय: नाशिककरांनो आता नायलॉन मांजा वापराल तर जेलमध्ये जाल !

नाशिक (प्रतिनिधी): नायलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापर आता महागात पडणार आहे.

नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजाची विक्री, निर्मिती किंवा वापर करताना दिसला तर त्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

या गुन्ह्यात चार महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

मांजा विक्री करताना किंवा तो वापरताना वारंवार आढळल्यास त्यांच्यावर तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. मकर संक्रांति सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी हे आदेश काढले आहेत. हा आदेश 4 जानेवारी पासून ते 31 जानेवारी पर्यंत शहरात लागू असणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

मकर संक्रांति सणाच्या निमित्ताने शहरात पतंग मोठ्या प्रमाणावर उडविले जातात. पतंग कापली जाऊ नये म्हणून नायलॉन मांजा व दोऱ्याला काचेची कटिंग करून काहीजण पतंग उडवत असतात. मात्र या नायलॉन मांज्यामुळे अपघात होतात. गेल्या वर्षीच याच नायलॉन मांजामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता तर मागील आठवड्यात दोन जण जखमी झाले होते. याबरोबरच झाडांवर व खांबांवर मांजा अडकल्याने वन्य पक्षी तसेच प्राणीदेखील जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9637,9635,9626″]

संक्रांति सणाच्या काळात प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत पथक नेमण्यात येणार आहे आहे हे पथक शहरात तपासणी करणार असून गोपनीय माहिती मिळाल्यास संबंधित ठिकाणी तपास केला जाणार असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शहरात गेल्या काही वर्षापासून अशा घटना वाढत आहेत त्यामुळे पोलिसांनी हा अध्यादेश काढला असून नागरिकांनाही नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन केलं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790