सिग्नलवरील वस्तू विक्रेते, भिकारी यांचेही लसीकरण करण्याची शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सिटी सेंटर मॉल सिग्नलसह शहरातील विविध ठिकाणी असणारे भिकारी आणि वस्तू विक्रेते यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम हाती घ्या, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने महापालिकेकडे केली आहे.
सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कलसह शहरातील सिग्नलवर भिकारी आणि विविध वस्तू विक्रेते रात्रंदिवस असतात.
त्यांचा नागरिकांशी संपर्क येतो. हे भिकारी, विक्रेते आणि त्यांच्या संपर्कात येणारे नागरिक यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी भिकारी व विक्रेत्यांनी लस घेतली किंवा नाही याची खात्री करावी.
त्यांना लस देण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगिता देशमुख, दिलीप दिवाने, प्रभाकर खैरनार, श्रीकांत नाईक, मनोज वाणी, विनोद पोळ, संजय टकले, मकरंद पुरेकर, शैलेश महाजन, निलेश ठाकूर, बापू आहेर, मनोज पाटील, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, सुनीता उबाळे, साधना कुवर, मीना टकले, बाळासाहेब तिडके, आशुतोष तिडके, नितीन तिडके, मनोज कोळपकर, मंदार सडेकर, डॉ. शशिकांत मोरे, अशोक पाटील, समीर सोनार, सचिन जाधव, यशवंत जाधव, दीपक दुट्टे, बन्सीलाल पाटील, संदीप महाजन, वैभव कुलकर्णी, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, बाळासाहेब दुसाने, दीपक ढासे, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी केली आहे. हे निवेदन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना गुरुवारी, २३ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आले आहे.
विविध भागात मोहीम राबवणार – वैद्यकीय आरोग्य अधिकारी:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिग्नलवरील विक्रेते व भिकारी यांना कोरोना प्रतिबंधक लस देणे ही मागणी योग्य असून, याची आम्ही दखल घेतली आहे. त्या-त्या भागातील वैद्यकीय कर्मचार्यांना संबंधित ठिकाणी पाठवून लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात येतील. शक्य तेवढे लसीकरण केले जाईल, असे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.