नाशिक: दुर्दैवी; पुरस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या नाट्यकलावंताचा अपघाती मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): गौळाणे फाट्याच्या वळणावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला ठोस मारल्याने त्यात नगर येथे राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या कलावंताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्रतीक संदीप निकम ( २० रा. आयुक्त निवास स्टॉप कॉटर्स, नेरूळ, नवी मुंबई ) हे बुधवारी ( ता.२२) त्यांच्या वडिलांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार मिळाल्याने वडील संदीप निकम यांना घेऊन पुरस्कार घेण्यासाठी दुचाकीवरून (एमएच- ०३० डीई-९०६३) नगर येथे जात होते.
रात्री साडेदहाच्या दरम्यान विल्होळी फाटा जलशुद्धीकरण केंद्रासमोर मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या भरधाव चारचाकीने त्यांना धडक दिली.
त्यात संदीप खंडू निकम यांचा मृत्यू झाला, तर प्रतीक गंभीर जखमी झाला. संदीप निकम हे नवी मुंबई महापालिकेत शिपाई या पदावर कार्यरत होते. नाट्यकलावंतदेखील होते. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिकला आलेल्या मावस सासूवर जावयाचा बलात्कार
नाशिक: तोंड धुऊन येतो म्हणे आणि हाताला झटका देऊन अटकेत असलेला संशयित आरोपी फरार !