या कारणामुळे हा पठ्ठ्या करायचा चेन स्नॅचिंग; याची ओळख वाचून धक्का बसेल!

👉 Ad: Office On Rent At Canada Corner. Whatsapp For More Details.

नाशिक (प्रतिनिधी): नंबरप्लेट नसलेल्या प्लेजर मोपेडवरून गंगापूर रोडवरील भाजी बाजार परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्‍या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असता अधिक चौकशीत तो अट्टल चेनस्नॅचर निघाला.

त्याच्याविरुद्ध चेनस्नॅचिंगचे पाच गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 लगडी जप्त केल्या आहेत.

यासह एक मोपेडही जप्त करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, की दि. 15 रोजी पोलीस मित्र असलेल्या नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोळसे व अंमलदार जाधव यांना एक व्यक्ती संशयास्पद रीतीने गंगापूर आकाशवाणी टॉवर परिसरात विनानंबर प्लेटच्या मोपेडवरून फिरत आहे, अशी खबर दिली.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

त्यानुसार ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांना देऊन त्याप्रमाणे सापळा रचण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, हवालदार बोळे, पोलीस नाईक महाले, मोहिते, अंमलदार जाधव, जगताप व भोये यांच्या पथकाने सापळा रचून या संशयित विपुल रमेश पाटील यास ताब्यात घेतले.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

तो चांदवङमध्ये शिकाऊ ग्रामसेवक म्हणून नोकरी करतो. त्याने कोरोना काळात 14 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी तो सुट्टीच्या दिवशी सोनसाखळी चोरत असल्याची कबुली त्याने दिली.

गंगापूर पोलीस ठाण्यात त्याची अधिक चौकशी करता भा. दं. वि. कलम 392 प्रमाणे त्याच्याविरुद्धचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून 11 तोळे वजनाच्या 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 लगडी व 20 हजार रुपये किमतीची प्लेजर मोपेड असा 5 लाख 14 हजार 859 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9335,9340,9330″]

ही कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, हवालदार बोळे, पोलीस नाईक मोेहिते, महाले, परदेशी व सोळसे, अंमलदार भोये, जगताप, चौधरी व पाडवी, तसेच गंगापूर पोलीस ठाण्याकडील पोलीस मित्र यांनी पार पाडली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790