नाशिकमध्ये शाळा सुरू घेण्यात आला हा महत्वाचा निर्णय!
नाशिक (प्रतिनिधी): दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे.
या पार्श्वभूमीवर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती.
राज्यातील शाळा या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने या आधी घेतला होता.
आता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे योग्य ठरेल का यावर चर्चा करण्यात आली आहे. शाळा उघडण्याबाबत काही आव्हान आहेत त्यावर देखील यात चर्चा झाली. शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करुण निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे सध्यातरी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमीका घ्यावी असं या बैठकीत ठरल्याचं समजतंय. दरम्यान नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.