मालेगाव(प्रतिनिधी): देशासह राज्यभरात लॉकडाऊन केले गेले आहे, या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असल्याने गोरगरिबांना व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना उदरनिर्वाहाचा कोणताही मार्ग नाही. रमजान महिना चालू आहे आणि लॉकडाऊनमुळे मुस्लीम बांधवांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या कठीण परिस्तिथी मध्ये गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे व नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या हस्ते किराणा साहित्याचे एकूण १००० पॅकेट चे वितरण करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग रत्नाकर नवले, उपविभाग पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग मंगेश चव्हाण यांचेसह मालेगावातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.