नाशिक: दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट? राजेश टोपेंचे विधान
नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोना निर्बंध काळजीपूर्वक शिथिल केले आहेत, जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलत आहे.
अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली आहे, असे नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगीतले दरम्यान राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल त्यांनी महत्वाचे विधान केले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात कुठेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झालेली नाही, मात्र दिवाळी नंतर कोरोना रुग्णसंख्येत स्पाईक येण्याची शक्यता असल्याचा टास्क फोर्सचा अंदाज असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यात टेस्टिंग कमी केलेल्या नाहीत. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरी लाट फ्लॅट झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत एक सुध्दा मृत्यू नाही, हा लसीकरणाचा फायदा असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.
तसेच लहान मुलांना लस देण्याबद्दल बोलताना, डोस उपलब्ध झाले आहेत, लहान मुलांच्या लस घेण्यासाठी इलिजीबल केलं असेल, तर आम्ही द्यायला तयार आहोत. लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी द्यावी असी आमची केंद्र सरकारला मागणी असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.