गोविंदनगर, कर्मयोगीनगर मार्गे गंगापूररोड, निमाणी चक्री बस सुरू करा- शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी गोविंदनगर, कर्मयोगीनगर मार्गे गंगापूररोड, निमाणी अशी चक्री बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे.
नाशिक परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांना निवेदन देण्यात आले आहे.
गोविंदनगर, सद्गुरूनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, जगतापनगर, हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर या भागातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणि शिकवणीसाठी जावे-यावे लागते.
नागरिकांचीही गंगापूररोड, कॉलेजरोड, महात्मानगर या भागात कामे असतात. येथे जाण्यासाठी अद्याप सिटी बस सुरू झालेली नाही. यामुळे गैरसोय होत आहे.
निमाणी, सीबीएस, मुंबई नाका, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल मार्गे महात्मानगर, गंगापूररोड, निमाणी अशी चक्री बस सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही बससेवा सुरू झाल्यास मोठी गैरसोय दूर होणार आहे. सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेनेच्या कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, दिलीप दिवाणे, श्याम अमृतकर, घनश्याम सोनवणे, श्रीकांत नाईक, डॉ. राजाराम चोपडे, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, डॉ. शशिकांत मोरे, पुरुषोत्तम शिरोडे, दीपक दुट्टे, संजय टकले, बापू आहेर, नितीन तिडके, बाळासाहेब राऊतराय, विनोद पोळ, आशुतोष तिडके, तुषार मोरे, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, किरण काळे, हरिष काळे, राहुल पाटील, सचिन अमृतकर, प्रकाश कदम, राहुल काळे, प्रथमेश पाटील, सचिन राणे, ज्योती वडाळकर, धवल खैरनार, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, वंदना पाटील, सुनीता उबाळे, ज्योत्स्ना पाटील, संध्या बोराडे, रेखा भालेराव, नीलिमा चौधरी आदींसह नागरिकांनी ही मागणी केली आहे