नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० सप्टेंबर) इतके रुग्ण घेत आहेत कोरोनावर उपचार

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३० सप्टेंबर) इतके रुग्ण घेत आहेत कोरोनावर उपचार

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८  हजार ७८९  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत ९५० रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५६,  बागलाण १८, चांदवड १९, देवळा २४, दिंडोरी २८, इगतपुरी ०७, कळवण ०९, मालेगाव १५, नांदगाव ०९, निफाड १२६, पेठ ०१, सिन्नर २१८, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०५, येवला ८५ असे एकूण ६२० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २९२,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २१  तर  जिल्ह्याबाहेरील १७ रुग्ण असून असे एकूण ९५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ३७०  रुग्ण आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8395,8383,8356″]

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १५,  बागलाण ०२, चांदवड ०१, देवळा ०६, दिंडोरी ०२, इगतपुरी ००, कळवण ०२, मालेगाव ०५, नांदगाव ००, निफाड १७, पेठ ००, सिन्नर २५ , सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०१, येवला ०६ असे एकूण ८१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.८९ टक्के, नाशिक शहरात ९८.१५  टक्के, मालेगाव मध्ये ९७.०६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ इतके आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार १६६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९८२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790